भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी पुन्हा खालावल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले . लतादीदींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले होते.
लता दीदींचं पार्थिव ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तेथून अंत्यदर्शनासाटी शिवाजी पार्क येथे ठेवण्यात येणार असल्याचे कळते. त्याच्यावर शिवाजी पार्क येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
Two-day national mourning to be observed in memory of Lata Mangeshkar. The National flag to fly at half-mast for two days, as a mark of respect: Govt sources
— ANI (@ANI) February 6, 2022