By  
on  

लता मंगेशकर निधन Live Update : पंतप्रधान मोदी विशेष विमानाने थोड्याच वेळात होणार दाखल

भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील प्रभुकुंज या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लता मंगेशकर यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. लता मंगेशकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळात मुंबईत दाखल होणार आहेत, शिवाजी पार्कवर जाऊन अंत्यदर्शन घेणार आहेत. शासकीय इतमामात लतादीदींवर  शिवाजी पार्त्यकवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive