भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील प्रभुकुंज या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींची रीघ लागली आहे. सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.
महाराष्ट्र सरकारने दीदींच्या निधनावर शोक व्यक्त करत सोमवारी 7 फेब्रुवारी 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022