भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटींसोबतच मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली आहे. फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये त्यांचं पार्थिव शरीर ठेवण्यात आलं आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दीदींवर अंत्यसंस्कार होणार आहे. तेथील ही क्षणचित्रे.
पंतप्रधान मोदीही मुंबईला रवाना झाले आहेत. लतादिदींची त्यांची अंत्ययात्र निघणार आहे. त्यांच्या “प्रभुकुंज ” निवास इथून लता दीदींची अंत्ययात्रा – महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन– हाजी अली जंक्शन–हाजी अली– वरळी सी फेस रोड– वरळी अॅट्रिया मॉल, वरळी नाका– पोद्दार हॉस्पिटल–दूरदर्शन सिग्नल–वरळीकर चौक– सिद्धिविनायक मंदिर– इंदू मिल–चैत्यभूमी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान, अशी निघणार आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागात लोक जमत आहेत.
लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मपंतप्रधान मोदीही मुंबईला रवाना झाले आहेत. लतादिदींची त्यांची अंत्ययात्र निघणार आहे. त्यांच्या “प्रभुकुंज ” निवास इथून लता दीदींची अंत्ययात्रा – महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन– हाजी अली जंक्शन–हाजी अली– वरळी सी फेस रोड– वरळी अॅट्रिया मॉल, वरळी नाका– पोद्दार हॉस्पिटल–दूरदर्शन सिग्नल–वरळीकर चौक– सिद्धिविनायक मंदिर– इंदू मिल–चैत्यभूमी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान, अशी निघणार आहे. लाखो त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागात लोक जमत आहेत.