By  
on  

लता मंगेशकर निधन Live Update : पतंप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजीपार्कवर दाखल

आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवर लतादीदींचं अंत्यदर्शन घेतलं आहे. शासकीय इतमामात लतादीदींवर  शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधानानंतर आता अनेक दिग्गज मंडळी दिदींना आदरांजली वाहत आहेत. विशेष विमानाने मोदी आज संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. त्यांनी लतादीदींना आदरांजली वाहत मंगेशकर कुटुंबियांचं सांत्वन केलं. 

लता मंगेशकर यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive