By  
on  

हॉरर कॉमेडीचा 'झटका' द्यायला सज्ज झालेत हे कलाकार

सध्या मराठी चित्रपटांत हॉरर चित्रपटाचा जॉनर खासकरुन वापरला जातोय. प्रेक्षकही नव्या धाटणीच्या विषयांना चांगलीच प्रसंती देत आहेत. आता प्रेक्षकांच्या भेटीला थ्रीलर कॉमेडी चित्रपट येत आहे. उत्तेजना स्टुडिओजची निर्मिती असलेला 'झटका : आत्ता सुरुवात गोंधळाची' या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना चांगलाच भावतोय. या चित्रपटात अभिनेत्री पूर्णिमा डे आणि नवोदित कलाकार गौरव उपासानी यांची फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळेल.

पूर्णिमाबद्दल बोलायचं झालं तर पूर्णिमा याअगोदरच झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'तुला पाहते रे' मधील नकारात्मक भूमिकेमुळे घराघरांत पोहोचली आहे. पूर्णिमाने हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना याअगोदरही घाबरवले असले, तरीही 'झटका' चित्रपटातून पूर्णिमाची आणि नवोदित गौरव उपासानीची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पोट धरून हसवणार आहे आणि  घाबरवणारदेखील आहे.

दोघंही एकमेकांना समजून घायला एकत्र राहण्याचं ठरवतात. त्यासाठी दोघंही नव्या फ्लॅटमध्ये शिफ्टही होतात. मात्र घडतं मात्र काहीतरी भलतंच.... दोघांचा रोमान्स फुलण्याआधीच त्यांना एक जबरदस्त 'झटका' मिळतो... आणि सुरु होतो एक जबरदस्त सस्पेन्स...हा 'झटका' तुम्ही टीझरमध्ये पाहिला असेलच...
ही जोडी लग्नाआधी एकत्र राहण्याचा विचारात असताना नव्या फ्लॅटमध्ये बंद कपाटात एक खून घडतो? तो कोणाचा? त्याचा खून कोण करतो? हे गुपित आहे.
या चित्रपटात असे काही सीन्स आहेत जिथे या दोघांचीही जोडी प्रेक्षकांना पुढे काय होईल, याचा अजिबात थांगपत्ता लागू देत नाही. या दोघांच्याही जबरदस्त अभिनयाच्या जोरावर शेवटपर्यंत तुम्ही क्लायमॅक्सचा अंदाज बांधू शकत नाही. गौरवने आपला भाऊ व  दिग्दर्शक अजिंक्य उपासानीसह या सिनेमाचा स्क्रिनप्लेही लिहिला आहे. गौरव ' झटका' या सिनेमाचा एक्झेक्युटीव्ह प्रोड्युसर आहे. शिवाय चित्रपटाची मूळ संकल्पनाही गौरव उपासानीचीच आहे.

 'झटका' चित्रपट येत्या ४  मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive