प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा घेतला. बप्पीदांमुळेच भारतीय संगीताला डिस्को गाण्यांची ओळख झाली व नवचैतन्य पसरलं. आता त्यांच्या निधनाने संपूर्ण कालविश्वालर शोककळा पसरलीय.
मराठीतील सुप्रसिध्द दिग्दर्शक संजय जाधव यांच्या लकी या सिनेमात बप्पी दांनी प्रसिध्द मराठी गायिका वैशाली सामंत हिच्या जोडीने कोपचा हे धम्माल सॉंग गायलं होतं. आपल्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी गायलेले हे पहिले मराठी गाणे आहे. संगीतकार अमिराज याने या गाण्याला संगीत दिलं होतं.
या गाण्याच्या लॉंचवेळी 2019 साली बप्पी दा म्हणाले होते, गाण्याविषयी बप्पी लाहिरी म्हणाले, “सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. 1975ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर ख-या अर्थाने सुरू झाले. आणि मी ‘लकी’ ठरलो. मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही. संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमामूळे मी मराठीत गायक म्हणून पदार्पण करतोय. “
लकी सिनेमातील बप्पी दांचं कोपचा गाणं खुप लोकप्रिय ठरलं होतं.