By  
on  

'सेकंड हँड' सिनेमातून अभिनेता सक्षम कुलकर्णी झळकतोय महत्त्वपूर्ण भूमिकेत

चित्रपट दिग्दर्शित करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यानुसार आतापर्यंत अभिनेते, संगीतकार, सिनेमॅटोग्राफर,संकलकांनी चित्रपट केल्याचा इतिहास आहे. त्यात आता कार्यकारी निर्मात्याचीही भर पडत आहे. अर्धा डझन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केल्यानंतर सचिन दुबाले पाटील आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसण्यासाठी सज्ज आहेत. "सेकंड हँड" या चित्रपटातून ते त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू करत आहेत. 

ब्रदर्स एंटरटेन्मेंट ही निर्मिती संस्था "सेकंड हँड" या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाची कथा सचिन - विष्णू यांची असून लेखन डॉक्टर भालचंद्र गायकवाड, अमित बेंद्रे यांचे आहे. अभिनेता सक्षम कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. "विषय आता खोलात जाणार..." अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे.  तर दोन हातांनी मिळून झालेल्या बदामाच्या आकृतीनं चित्रपट प्रेमाविषयी असण्याचा अंदाज आहे. मात्र चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधी आहे. मुळचे बीडचे असलेले सचिन दुबाले पाटील कामाच्या शोधात पुण्यात आले. कॉफी शॉपमध्ये काम करायला सुरुवात केली. काम करताना चित्रपटक्षेत्रातील काही जणांशी त्यांची मैत्री झाली. त्यांच्याकडून चित्रपटाविषयी माहिती मिळायला लागली. बुममॅन म्हणून चित्रपट क्षेत्रात काम सुरू झाल्यावर पुढे कार्यकारी निर्माता म्हणून आठ ते दहा चित्रपट केले. आटपाडी नाइट्स, अबक, हेडलाईन, बाजार, खिचिक असे उत्तमोत्तम चित्रपट कार्यकारी निर्माता म्हणून त्यांच्या नावावर आहेत.

चित्रपट क्षेत्रात प्रवेश केल्यावर वेगवेगऴ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं. त्यांचं काम पाहताना माझ्याही मनात दिग्दर्शन करण्याचा विचार आला. त्यासाठी आधी चित्रपटाचं तंत्र नीट समजून घ्यायचं ठरवलं. त्यानुसार आता सेकंड हँड या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. घरची चित्रपट क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात प्रवेश झाला आणि चित्रपट दिग्दर्शनापर्यंत येऊन पोहोचलो याचा आनंद आहे, अशी भावना सचिन दुबाले पाटील यांनी व्यक्त केली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive