By  
on  

आली लग्नघटिका समिप! या दिवशी शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर चढणार बोहल्यावर

बॉलिवूडमधलं सर्वात चर्चित कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या शाही लग्नाचा थाट उरकल्यानंतर.आता बॉलिवूडमधलं आणखी एक कपल बोहल्यावर चढणार अआहे. अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हे दोघं नेहमीच एकत्र हिंडताना स्पॉट होतात. कधी तर परदेशातही हया जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते.

 

फरहान आणि शिबानी जवळपास तीन- चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनीही आपल्या नात्यात पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाबाबत अनेक तर्क लावले जात होते. मात्र, आता तारीख समोर आली आहे. सूत्रांनुसार हे कपल,  21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत, मात्र त्याआधी 19 फेब्रुवारीला फरहान आणि शिबानी महाराष्ट्रीयन रितीरिवाजांनुसार लग्न करण्याची शक्यता बोलली जात आहे. 

फरहान- शिबानीचा हा लग्न सोहळा खंडाळा येथील फरहान अख्तरच्या फार्महाऊसवर होणार आहे, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. एक खासगी आणि कौटुंबिक सोहळा पार पडेल.

अभिनेता  फरहान अख्तरने 2017 साली पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुली आहेत. तर शिबानी दांडेकरचं हे पहिलं लग्न आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive