By  
on  

रितेश देशमुख म्हणतो, “I love myself but…”

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा देशमुख सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. पती रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ ती शेअर करते. जिनिलिया आणि रितेश हे सेलिब्रिटी वर्तुळातलं सर्वात गोड कपल मानलं जातं. दोन मुलांसोबत त्यांचा सुखी संसार सुरु असल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. दोघंही भन्नाट आहेत, याची प्रचिती वेळेवेळी सोशल मिडीयावर येते. बॉलिवूडमधील याप्रसिध्द कपलची नेहमीच जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतै.  

नेहमीप्रमाणेच एक छान व्हिडीओ रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. पण हा व्हिडीओ नेहमीप्रमाणे धम्माल नाही तर हदयस्पर्शी व रोमॅंटिक आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश दिसतो आणि बोलतो “माझं स्वत: वर प्रेम आहे, पण… आणि पुढे रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ असून त्याच्या बॅकग्राऊंडला ‘I like me better’ हे गाणं प्ले होतं असल्याचे दिसते. हा व्हिडीओ शेअर करत “I love myself but….,” असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

चाहत्यांनी रितेश-जिनिलियाच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive