By  
on  

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, मुंबई पोलिसांना दिले हे आदेश

प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नाय वरणभात लोन्चा कोण नाय कोन्चा हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर बराच वादंग सुरु झाला. . या सिनेमाच्या बोल्ड कथानकावर आक्षेप घेतला . तसेच यामध्ये महिला आणि लहान मुलांचे लैंगिक चित्रीकरणाचे काही सीन दाखवले आहेत. याच्याविरोधात दोन संघटनांनी कोर्टात तक्रार केली आहे. त्यानंतर मांजरेकरांविरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा त्यातील काही भडक दृश्यांवर महिला आणि बाल आयोगाने कठोर शब्दांत आक्षेप घेत त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या यामुळे अडचणी वाढल्या होत्या, मुंबईतील माहिम पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून मांजरेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत मुंबई पोलिसांनी मांजरेकरांविरोधात कुठलीही कारवाई करु नये अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. 

28 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो रद्द व्हावा यासाठी महेश मांजरेकर यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना या आधीच्या सुनावणीमद्ये दिलासा देण्यास नकार दिला होता. महेश मांजरेकांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर आज हा निर्णय न्यायालयाने बदलला असून मांजरेकरांना अटकेपासून दिलासा दिलाय.

नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा या सिनेमाचे कथानक मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांचा संपाची पार्श्वभूमी, या संपामुळे झालेली त्यांची वाताहत यावर आधारीत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive