By  
on  

नेहा पेंडसेच्या जागी 'भाबीजी घर पर है'मालिकेत झळकतेय ही अभिनेत्री

निरखून पहा! नवीन अनिता भाभी, विदिशा श्रीवास्‍तव अपने मॉडर्न कॉलनी में घर पर है! प्रतिभावान बॉलिवुड अभिनेत्री यामी गौतमशी साम्‍य असलेली विदिशा एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये नवीन मोहक व स्‍टायलिश अनिता भाभीच्‍या भूमिकेत फॅशनेबल साड्या व भारतीय फ्यूजन पोशाखासह चमकण्‍यास आणि प्रेक्षकांच्‍या मनावर छाप पाडण्‍यास सज्‍ज आहे.

आपल्‍या प्रवेशाबाबत सांगताना उत्‍साहित विदिशा श्रीवास्‍तव म्‍हणाली, ''मला खूपच आनंद झाला आहे. मी एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये अनिता भाभीची भूमिका साकारण्‍यासाठी प्रवेश केल्‍यापासून माझ्या फोनची रिंग वाजणे थांबलेले नाही. माझ्यासाठी हा सन्‍मान व मोठा क्षण आहे. माझ्या कुटुंबियांना आनंद होण्‍यासोबत त्‍यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण ही त्‍यांची आवडती मालिका आहे आणि अनिता भाभी ही त्‍यांची आवडती आहे. कोणीही कल्‍पना केली नव्‍हती की एकेदिवशी मी या मालिकेमध्‍ये अनिता भाभी म्‍हणून काम करत असेन. माझ्या भावना व आभार व्‍यक्‍त करण्‍यासाठी माझ्याकडे शब्‍दच नाहीत. ही जीवनातील अमूल्‍य भूमिका आहे आणि मला ही संधी दिल्‍याचा आनंद होत आहे.''

मालिकेमधील नवीन अनिता भाभीच्‍या लुकबाबत सांगताना विदिशा म्‍हणाली, ''मोहक व फॅशनेबल साड्यांसह हा पूर्णत: नवीन लुक आहे. प्रखर रंगसंगतीसह आकर्षक व पेस्‍टल रंगांचा वापर करण्यात आला आहे, ज्‍यामधून क्‍लासी व मोहक लुकची चमक दिसेल. पाश्चिमात्‍य पोशाखला भारतीय फॅब्रिक्‍सची जोड देण्‍यात येईल, ज्‍यामधून भारतीय-पाश्चिमात्‍य फॅशन लुकचा अनुभव मिळेल. आभूषणांमध्‍ये देखील आकर्षक डिझाइन्‍सचा समावेश असेल, ज्‍यामध्‍ये लुकला परिपूर्ण अशा पांरपारिक व आधुनिक आभूषणे आहेत. मेकअप अधिककरून नैसर्गिक असेल, ज्‍यामध्‍ये माझे खरे रूप कायम ठेवण्‍यासोबत लुकला साजेशा अशा आकर्षक शेड्सचा समावेश असेल. माझ्या नैसर्गिक त्‍वचेच्‍या चमकसाठी न्‍यूट्रल शिमर वापरण्‍यात येईल, तसेच काही मस्‍करा व चमकदार न्‍यूट्रल आय शॅडो वापरण्‍यात येईल. केशभूषेमध्‍ये साधे-सरळ केस असतील, जे खांद्यांपर्यंत लांब असतील. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना निश्चितच अनिता भाभीचा हा नवीन लुक आवडेल आणि ते खुल्‍या मनाने तिचे स्‍वागत करतील. मी या क्षणाचा भरपूर आनंद घेत आहे आणि नवीन अनिता भाभी म्‍हणून माझा स्‍वीकार करण्‍यासोबत प्रेक्षकांच्‍या प्रतिक्रिया जाणून घेण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.''

 

नवीन अनिता भाभी म्‍हणून विदिशा श्रीवास्‍तवचे स्‍वागत करण्‍यास सज्‍ज राहा आणि पहा 'भाबीजी घर पर है' दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive