By  
on  

भेटा महाराष्ट्रातल्या विश्वविजेत्या ‘मल्लखांब’ गर्ल ला छोट्या पडद्यावर

जेव्हा तुम्ही फिटनेसचा विचार करता तेव्हा, डोळ्यासमोर जिम, पिलाटेज किंवा धावणे असे प्रकार येतात. मात्र, फिटनेस किंवा स्वास्थ्य हा गेल्या शतकभरापासून आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पैलवान त्यांची ताकद आणि चपळाई उंचावण्यासाठी ‘मल्लखांब’वर कौशल्य मिळवण्यात कित्येक वर्ष खर्च करतात. आणि महाराष्ट्रातल्या फक्त 21 वर्षांचा हिमानी परब खांब आणि दोरीपासून खेळल्या जाणाऱ्या ‘मल्लखांब’तील आपल्या नैपुण्यानं संपूर्ण जगाला अचंबित करत आहे

. पाहा कशाप्रकारे ही लहान मुलगी या प्रामुख्याने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्रीडाप्रकारात अग्रेसर ठरली आहे, ओएमजी!ये मेरा इंडिया’मध्ये येत्या सोमवारी, 21 मार्च रोजी, रात्री 8 वाजता, केवळ हिस्ट्रीटीव्ही 18 वर. या ट्रेंडसेटर ठरलेल्या, अस्सल, वास्तववादी मनोरंजक मालिकेने असामान्य भारतीय व त्यांच्या अनोख्या गुणवत्तेच्या प्रेरणादायी कथा दर सोमवारी रात्री 8 वाजता समोर आणत प्रेक्षकांना “ओएमजी!” म्हणायला लावण्याचे आपले आश्वासन सातत्याने पूर्ण केले आहे.

योग, कुस्ती आणि जिमनॅस्टिकच्या सर्वोत्तम प्रकाराचा मेळ घालणारा ‘मल्लखांब’ हा व्यायामाचा प्रकार नैपुण्य संपादन करण्यास अतिशय अवघड आहे. मात्र, आपल्या बहिणीपासून प्रेरणा घेत हिमानीने हा क्रीडाप्रकार शिकण्याचे ठरवले आणि चिकाटी व मेहनतीच्या जोरावर 2019 जागतिक ‘मल्लखांब’ चॅम्पिनयनशीपमध्ये 4 सुवर्ण आणि 2 ब्राँझ मेडल्स मिळवली. तिच्या कामगिरीची दखल घेतली गेली आणि 2021 मध्ये ती ‘मल्लखांब’साठी अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली क्रीडापटू ठरली. तिच्या या आव्हानात्मक प्रवासाविषयी जाणून घ्या, या सोमवारी रात्री 8 वाजता, ‘ओएमजी!ये मेरा इंडिया’मध्ये

ही तरुण विश्वविजेतीविषयी जाणून घ्या.सोमवारी ‘ओएमजी!ये मेरा इंडिया’ पाहा, रात्री 8 वाजता केवळ हिस्ट्रीटीव्ही18 वर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive