By  
on  

हेमांगी कवी म्हणते, “प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात एकदा तरी…”

आपल्या बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्यांसाठी अभिनेत्री हेमांगी कवी चर्चेत असते. ती आपलं मत ठामपणे मांडते. सोशल मिडीयावर तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगते.विविध विषयांवरील मतं हेमांगी तिच्या पोस्टमधून मांडत असते. 

नुकतंच हेमांगी कवीने अभिनेत्री छाया कदम हिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मला तुझा अभिमान वाटतो, असे म्हटलं आहे.

हेमांगी कवी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने झुंड चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री छाया कदम दिसत आहेत.

हेमांगीची पोस्ट 

 

 

 

 

प्रत्येक actor ला वाटत असतं की आयुष्यात साला एकदा तरी बच्चन सोबत काम करायला मिळावं. सुप्त इच्छा कधीतरी पूर्ण होऊ देत यासाठी प्रार्थना करत असतो. किती स्वप्न पडतात की आपण बच्चन सोबत scene करतोय याची. निदान मला तरी पडतात. माझ्यासाठी स्वप्नवतच आहे ते.
पण #झुंड च्या निमित्ताने @chhaya.kadam.75 तू ते खरं करून दाखवलंस. एक scene मिळावा किंवा एक dialouge ही चालेल किंवा passing सुद्धा मिळालं त्यांच्या frame मध्ये तरी भरून पावू असं वाटतं. पण तू चक्क त्यांच्या बायकोचा रोल किंवा partner म्हणू शकतो असा रोल केलास. तेवढ्याच ताकदीनं उभी राहिलीस. कुठून आणलंस एवढं बळ यार? खरंच एक अभिनेत्री म्हणून, एक मैत्रीण म्हणून तुझा अभिमान वाटतो आणि तुझ्या संपूर्ण अभिनय प्रवासाचं कौतुक ही. और क्या चाहीए! कसलं भारी वाटतंय काय सांगू यार.
यासाठी @nagraj_manjule चे आभार मानेन की त्याने तुझ्यातल्या कसदार अभिनेत्रीवर, मैत्रिणीवर एवढा विश्वास दाखवला! किती conviction असेल त्याला तुला cast करायचं! नाहीतर इथं बरेच जण नुसतंच 'तू किती भारी अभिनेत्री आहेस, कमाल मैत्रीण आहेस' असं सांत्वनपर बोलून 'अगं, producer ला, प्रथितयश actor समोर अमुक अमुक अभिनेत्रीच cast करायचीय गं, माझ्या हातात असतं ना तर तुलाच cast केलं असतं' हे 'बच्चन' देऊन पळ काढतात.
असो, तुला त्यांच्या सोबत काम करताना पाहून वाटलं साला आपणच काम करतोय. क्या बात है... Proud proud and extremely happy! Love u रे! आणि माझी तुझ्या सोबत काम करायची इच्छा एक नाहीतर दोन चित्रपटांमुळे पूर्ण झाली म्हणून मज्जा! Yay

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive