By  
on  

'शांताबाई' फेम गायकाला संजीव राठोड यांनी दिली गाण्याची संधी, अनेक वर्ष होते दुर्लक्षित

2015 मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात धुमाकुळ  घातला  होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला 85 कोटीहुन जास्त व्हीज मिळाले आहेत. या गाण्याचे मालकी हक्क सुमीत म्युझिकच्या मालकीचे होते. हे हक्क आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक 'शांताबाई' म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा याने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचं मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. 

या सर्वांत एक महत्त्वाची गोष्ट आमदार निवास सिनेमाचे निर्माते संजीव राठो़ड यांनी प्रकाशझोतात आणली आहे. ती म्हणजे, अवघ्या महाराष्ट्राला शांताबाईच्या तालावर  ठेका धरायला लावणारे गायक संजय लोंढे हे या गाण्याच्या प्रसिध्दीनंतर दुर्लक्षित का राहिले., त्यांना कुणीच कशी संधी दिली नाही हे प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय लोंढे हे पुण्याच्या राजेवाडी झोपडपट्टीत आपलं जीवन हलाखीच्या परिस्थितीत व्यतीत करत आहेत. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीने त्यांच्या कलागुणांकडे पाठ का फिरवली असा सवालही  निर्माते संजीव राठोड यांनी केला आहे. 

दरम्यान, शांताबाईचे हक्क निर्माते संजीव राठोड यांनी गायक संजय लोंढे यांच्याकडून विकत घेत त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तसंच त्यांच्या हलाखीच्या परिस्तितीची घरी जाऊन आपुलकीने विचारपूसही केली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive