By  
on  

पुष्कर जोग, मंजिरी फडणीस स्टारर 'अदृश्य' या दिवशी रसिकांच्या भेटीला

बॉलिवूड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा 'अदृश्य' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .

'अदृश्य' चित्रपटात  पुष्कर जोग , मंजिरी फडणीस  ,अनंत  जोग , उषा  नाडकर्णी ,अजय कुमार सिंग  यांच्या प्रमुख भूमिका आहेत .

'अदृश्य' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत शाहिद लाल यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे . चित्रपटाचे संकलन संजय इंगळे यांनी केले आहे आणि संवाद निखिल कटरे व चेतन किंजाळकर यांनी लिहिले आहेत.

१३ मे रोजी अदृश्य सर्वत्र महाराष्ट्रत प्रदर्शित होत आहे .
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive