By  
on  

'चंद्रमुखी'वरुन होणा-या वादावर दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात,'पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यात फक्त अमृताच..''

मोठ्या थाटामाटात प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' सिनेमाचा पोस्टर लॉंच सोहळा पार पडला. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच 35 फुटांच्या कटआऊटचे अनावरण करून सिनेमातील अभिनेत्रीचा लूक सादर करण्यात आला  आणि असा भव्य कार्यक्रम रॉयल ऑपेरा हाऊस सारख्या ठिकाणी पार पडला ही मराठी चित्रपसृष्टीसाठी खरंच अभिमानाची बाब आहे. या दरम्यान चंद्रमुखी कोण हे प्रेक्षकांसमोर उलगडलं. अभिनेत्री अमृता खानविलकर या  सिनेमाची नायिका चंद्रा साकारतेय तर अभिनेता आदिनाथ कोठारे तिचा नायक दौलत साकारतोय. या आगामी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान गेले काही दिवस एका वादाला तोंड फुटलंय. ते म्हणजे, दिलखेचक अंदांनी भुरळ पाडणा-या चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी मला विचारणा करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा अभिनेत्री-नृत्यांगना मानसी नाईकने एका मुलाखतीत केला होता. म्हणूनच या वादावर अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

मात्र दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी या सर्व अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी अमृता खानविलकरचे नाव ठरले होते, असे सांगत त्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“मी जेव्हा चंद्रमुखी हा चित्रपट करायचे ठरवले तेव्हा लावणी या लोककलेला जागतिक पातळीवर न्यायचे ठरवले. मी जेव्हा या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विचार करत होतो, तेव्हापासून दिग्दर्शक म्हणून माझ्या डोक्यात फक्त अमृता खानविलकर हिचेच नाव होते. मी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीचा विचारही केला नाही, अमृताच या भूमिकेला योग्य न्याय देईल याची मला पूर्ण खात्री आहे.”, असे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले.

-तसंच प्रसाद ओक पुढे सांगतात, लावणीसम्राज्ञी या भारदस्त असतात.त्यामुळे अमृताने या भूमिकेसाठी पाच ते सात किलो वजन वाढवलं. तसंच या भूमिकेसाठीसुध्दा बरीच मेहनत घेतलीय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive