By  
on  

पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२२ यंदा ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना जाहीर

जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक श्री. भरत कामत आणि हार्मोनियम वादक श्री. सुधीर नायक यांना यंदाचा  पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२२  प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार आहे. 

जीएसबी सभा, मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. येत्या रविवारी २७  मार्चला सायंकाळी ५.३० वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक श्री. भरत कामत आणि हार्मोनियम वादक श्री. सुधीर नायक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे यांची संगीत मैफल होणार आहे. त्यांना सुधीर नायक हार्मोनियम साथ, भरत कामत तबला साथ, माधव पवार पखवाज साथ, रवींद्र शेणॉय मंजिरा साथ करणार आहेत. ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेश हेगडे, श्री. प्रकाश गंगाधरे, श्री. प्रवीण कानविंदे, श्री. प्रवीण शिंपी, श्री. विनोद सौदागर आणि श्री. जयप्रकाश बर्वे आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष श्री. बी.एस. बलिगा, उपाध्यक्ष श्री.सच्चीदानंद पडियार, सरचिटणीस  श्री गणेश राव, संयोजक श्री. के व्ही एन भट, श्री.यु. पद्मनाभ पै आदी मंडळींनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याच्या प्रवेशिका   महाराष्ट्र सेवा संघ हॉल, मुलुंड येथे सकाळी १०.३० ते संध्या.७  पर्यंत उपलब्ध आहेत तरी जास्तीतजास्त रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive