अभिनेत्री मिथिला पालकरचे आजी - आजोबा हे कायम तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टमधून दिसतात. आजी - आजोबांसोबतचे खास क्षण मिथिलाने अनेकदा सोशल मिडीयावरून शेयर केले आहेत. मात्र मिथिलाने नुकतीच केलेली पोस्ट मन सुन्न करणारी आहे.
यावेळी मिथिलाने तिच्या आजोबांसोबतचे फोटो पोस्ट केले मात्र त्याचं कारण फार दुखद आहे. मिथिलाचे आजोबा ज्याने ती भाऊ म्हणून संबोधते त्यांचं नुकतच निधन झालय. भाऊंच्या निधनाने मिथिलाच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळलाय. मिथिलाने तिचं हे दु:ख सोशल मिडीयावर शेयर केलय.
मिथिला या पोस्टमध्ये लिहीते की, "माझ्या जगाचे केंद्रबिंदू, मला सतत प्रोत्साहन देणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेले. त्यांच्याशिवाय आयुष्य कसं असेल, याचा मी विचारच करू शकत नाही. कदाचित तसं पुन्हा असणार नाही. ते लढवय्ये होते. आयुष्यावर प्रेम करणारे होते. त्यांच्यासारखंच आम्ही राहू. ते माझ्यासाठी खूप स्पेशल होते आणि माझ्यासाठी ते नंबर १ होते. भाऊ तुम्हा छान राहा. आता स्वर्गात नक्कीच आनंद असेल. कारण सतत हसणारे तिथे आले आहेत."
मिथिलाही तिच्या आजी - आजोबांच्या फार जवळ आहे. मिथिलाही दादर येथे तिच्या आजी - आजोबांसोबत राहत असे. तिच्या करियरच्या यशात तिच्या आजी - आजोबांचा मोठा वाटा असल्याचं ती कायम सांगते. मिथिलाच्या या दु:खात सहभागी होऊन अनेकांनी भाऊंसाठी सोशल मिडीयावर श्रद्धांजली वाहिली आहे.