By  
on  

ही मराठी अभिनेत्री सांगते, "शिवाजी महाराजांच्या चित्रपटाचा भाग असणं हेच माझ्यासाठी ........"

नॅशनल अवॉर्ड फिल्म भोंगा, ब्लॉकबस्टर मुळशी पॅटर्न, आणि सुभाष घईच्या विजेता चित्रपटातुन प्रचंड यश मिळविलेली अभिनेत्री दीप्ती धोत्रे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सुंदर लुक साठी ओळखली जाते. दीप्ती धोत्रे केवळ मल्टीटॅलेंटेड अभिनेत्री नसून ती एक फिटनेस उत्साही देखील आहे , आणि तिचे सोशल मीडिया हे सागळे सांगते. फिटनेस साठी जिम्नॅस्टिकस आणि मलखंब करणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. 

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक या सिनेमासत्रारतील चौथे पुष्प  "शेरशिवराज" हा चित्रपट शिवाजी महाराजांचा अफझल खानावर विजय आणि प्रतापगडाच्या लढाईत मराठा सैन्याच्या विजयाची कहाणी जिवंत केली आहे. पूर्वीच्या काळी कोंकणात सावंतांच घराणं ओळखलं जायचं , राजे सावंत यांची पत्नी सवंतीणीची भूमीला दीप्ती साकारतेय. तिचा अनुभव सांगताना अभिनेत्री म्हणते, " शिवरायांचा इतिहास लोकांसमोर मोठ्या पडदयावर मांडताना त्यात थोडाफार का होईना माझाही सहभाग आहे. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, हि व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला कोंकणी भाषा बोलावी लागली,यासाठी मी दिग्पाल सरांची मदत घेतली, माझं काम लोकांना आवडतंय याचा मला आनंद आहे, मुळात चित्रपट लोकांना आवडतंय यातच सागळ आलं." 

 

दीप्ती सोबत या चित्रपटात  स्वतःहा दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर , मुकेश ऋषी , अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, मृणाल कुलकर्णी आदी अभिनेत्यांची फौज बघायला मिळेल. 
 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive