By  
on  

‘सैराट’ला सहा वर्ष पूर्ण, रिंकूने शेअर केला खास फोटो

सैराट या सुपरहिट मराठी सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. आर्ची-परश्याची अनोखी लव्हस्टोरी महाराष्ट्रातच नाही तर देशभर गाजली. सिनेमातले सीन्स आणि संवाद लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पाठ झाले. या सिनेमावर रसिकांनी भरभरुन प्रेम केलं. सैराट हा सिनेमाच नाही तर ही एक अप्रतिम कलाकृती. नागराज मंजुळे दिग्दर्शित ह्या सिनेमाने इतिहास रचला. आर्चीच्या भूमिकेतील रिंकू राजगुरु आणि परश्याच्या भूमिकेतील आकाश ठोसर हे दोघंही रातोरात स्टार झाले. आता चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झालीत या निमित्ताने रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. आज या ब्लॉकबस्टर चित्रपटाला तब्बल ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीसुद्धा हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाल्यासारखा वाटतो कारण या कलाकारांची क्रेझ आजही लोकांमध्ये पाहायला मिळते. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये रिंकू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंड, अरबाज शेख दिसत आहेत. या सगळ्या कलाकारांना या चित्रपटाने एका रात्रीत सुपरस्टार बनवलं होतं. हा फोटो शेअर करत सैराटला ६ वर्ष पूर्ण झालीत अस कॅप्शन रिंकूने दिलं आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive