By  
on  

शेर शिवराज प्राईम टाईमपासून वंचित, आस्ताद काळे म्हणतो...

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज या शिवराजअष्टकातील चौथ्या पुष्पाची सध्या जौरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक सिनेमात अफजल खानाचा वध दाखविण्यात आला आहे. शेर शिवराज या सिनेमावर रसिक प्रेक्षक आणि समिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी करुनही या सिनेमाला प्राईम टाईम मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याआधी या बाबत अभिनेता  अक्षय वाघमारे याने केलेली निषेधाची पोस्ट चर्चेत होती. त्यानंतर आता  काही स्करीनशॉट्स शेयर करत अभिनेता आस्ताद काळेनेही संताप व्यक्त केलाय. 

 

आस्ताद काळेनं त्याच्या फेसबुकवर शेर शिवराज चित्रपटाला मिळलेल्या स्क्रिनिंग टाइमचे काही स्क्रिनशॉट शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यात त्यानं मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘जून किती वर्षं “महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमधे मराठी चित्रपटांनाच योग्य स्थान मिळत नाही” या गोष्टीचा त्रास सहन करायचाय??? किती वर्षं?????’

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive