मराठी सिनेसृष्टीत 80-90 चा काळ गाजवणा-या नायिकांपैकी एक असलेला प्रसिध्द चेहरा म्हणजे प्रेमा किरण. मुंबईत नुकतंच त्याचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.
८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे.