By  
on  

प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘उनाड’ची निवड

मराठी सिनेसृष्टी आता कात टाकतेय. यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करतेय. एकामागोमाग एक उत्तम कथानक असलेले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला तर येतातच आहेत पण रसिक प्रेक्षक आणि समिक्षकांच्या पसंतीसही उतरतायत. एका आगामी सिनेमाच्या बाबतीत तर एक अनोखी गोष्ट घडलीय. 

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव आहे ‘उनाड’. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बाजी मारली आहे. चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ( Zlin International Film Festival) युवा विभागाच्या फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ‘उनाड’ची निवड झाली आहे. ही खरंच मराठी चित्रपटासाठी आनंदाची बातमी आहे असं म्हणता येईल.

 

 

 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर यांनी केली आहे. तसेच आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव हे कलाकर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive