By  
on  

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लोकेश गुप्ते व चैत्राली गुप्तेंची नवी इनिंग

मराठी सिने आणि टेलिव्हिजन सृष्टीतील  प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांच्या नव्या इनिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.आतापर्यंत  अभिनय आणि दिग्दर्शकीय क्षेत्रात काम केल्यानंतर ते आता अभिनेत्री पत्नी चैत्राली सह निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत . अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर त्यांनी सोशल मीडियाच्या  माध्यमातून त्यांच्या "मनोरंजन फिल्म कंपनी" या प्रॉडक्शन हाऊसच्या लोगोचे अनावरण करत, याबाबत अधिकृत घोषणा केली. 

लोकेश गुप्ते यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं असून, के.के.मेनन स्टारर 'एक सांगायचंय' या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive