By  
on  

प्राजक्ता माळीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव, 'कमला रायझिंग स्टार' पुरस्काराची ठरली मानकरी

कलाविश्वातील एक आघाडीची गोड अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हे नाव आग्रहानं घेतलं जातं. सोशल मिडीयावर प्राजक्ता सतत सक्रीय असते. चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहते. नुकतंच प्राजक्ताने आपल्या सोशल मिडीयावरुन तिला राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आल्याचं सांगितलं. तसंच या सोहळ्याचे खास फोटोही तिने चाहत्यांशी शेयर केले. अक्षय तृतीयेच्या दिवशी महारा्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते कमला रायझिंग स्टार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive