By  
on  

‘1ओटीटी’ आणि ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’दरम्यान दर्जेदार कार्यक्रमांसाठी करार

ओटीटी’अर्थात ‘भारत का अपना मोबाईल ओटीटी’ या संमिश्र प्रसारण ओटीटीने‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ (‘डब्ल्यूडब्ल्यूआय’) या चित्रपट, संपर्क व सर्जनशील कला प्रशिक्षण संस्थेबरोबर सहकार्य करार केला असून ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’मधील विद्यार्थ्यांनी गेली कित्येकवर्षे तयार केलेले चित्रपट या ओटीटीवर दाखवले जाणार आहेत. ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’चे संस्थापक-अध्यक्ष सुभाष घई आणि ‘1ओटीटी’चे नरेंद्र फिरोदिया व स्वप्नील जोशी यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

 

‘डब्ल्यूडब्ल्यूआय’मधील विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपट ‘1ओटीटी’ या विविध भाषांमधील कार्यक्रमांसाठी सुरू केलेल्या व्यासपीठावर प्रदर्शित केले जाणार आहेत. यातील काही चित्रपट हे आजच्या आघाडीच्या दिग्दर्शकांनी ते ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’ शिकत असताना काही वर्षांपूर्वी बनविलेले आहेत. ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’ ही  ‘1ओटीटी’ला त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दर्जेदार, अलीकडे तयार झालेले आणि उत्तम करमणूकमुल्ये असलेले चित्रपट उपलब्ध करून देणार आहे.

 

‘1ओटीटी’ हा ‘भारत का अपना मोबाईल ओटीटी’ असून त्याची सुरुवात स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योगपती व दानशूर व्यक्तिमत्त्व नरेंद्र फिरोदिया यांनी संयुक्तपणे केली आहे. ‘1ओटीटी’ला ‘भारत का अपना मोबाईल ओटीटी’ म्हणून मान्यता असून फिरोदिया व जोशी यांच्याबरोबरच या संस्थेला डीटीएल अॅक्टीव्हेशन क्षेत्रातील विनायक सातपुते यांच्याबरोबर संस्थापक सदस्य विनायक श्रीनिवासन, राजीव जनी, प्रख्यात बँकर सतीश उतेकर, करमणूक क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्त्व चेतन मणियार यांचेही मोलाचे पाठबळ आहे.

 

बॉलीवूडमधील ख्यातकीर्त दिग्दर्शक आणि ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष श्री सुभाष घई या संयुक्त प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाले, “प्रतिभावान अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योगपतील नरेंद्र फिरोदिया यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘1ओटीटी’बरोबर सहकार्य करार करताना मला अतिशय आनंद होत आहे.या संयुक्त भागीदारीतून आम्हाला आमच्या काही अत्यंत प्रतिभावान अशा विद्यार्थ्यांच्या कलाकृती या व्यासपीठावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्यातील काही विद्यार्थी हे आज हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक आहेत.”

 

मी जेव्हा चित्रपट बनवत होतो तेव्हा हिंदी मध्ये बनवायचो पण आता विविध भाषेत चित्रपट बनतात आणि ते चांगला धंदा देखील करतात. त्यामुळे आपल्याला आता कोणत्याही एका भाषेत चित्रपट बनवून चालणार नाही तर तो जास्तीत जास्त भाषेत तयार करावा लागणार आहे आणि हे सिनेमाचे भविष्य आहे. गेल्या वीस वर्षात सिनेमांमध्ये एवढा बदल आलेला आहे जसं काय एक तुफानच आल आहे. जेव्हा मला समजलं माझे मित्र स्वप्निल जोशी यांनी एक असं अॅप बनवलं आहे जे युनिक आहे हे ओटिटी अॅप म्हणजे एक आणि त्याच्या भाषा अनेक आहेत. आपल्या भारतात जरी भाषा अनेक असल्या तरी बोलीभाषा या पाच हजारपेक्षा जास्त आहेत असे श्री सुभाष घई म्हणाले.

बॉलीवूडमधील ख्यातकीर्त दिग्दर्शक आणि ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष श्री सुभाष घई या संयुक्त प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाले की  वाल्मिकी ते तुळसीदास यांच्यापर्यंत १०००० कथा आलेल्या आहेत पण त्यातील आत्तापर्यंत फक्त २००० कथांचे रूपांतर चित्रपटात झालेले आहे. त्यासाठी मी अॅक्टींग स्कूल उघडली व आता माझ्या जीवनाच्या भाग २ मध्ये मी चित्रपट बनवतच राहणार आहे पण मला आत्ता चित्रपट बनवणारे घडवायचे आहेत. म्हणूनच मी व्हिसलिंगवूड च्या अंतर्गत माझ्या विद्यार्थ्यांना असे सांगतो की ज्या काही कथा बाकी आहेत त्या कथांवर तुम्हीच काम करा, त्यातील त्याचा भावार्थ समजून घ्या, त्याचा दृष्टीकोन समजून घ्या, आणि मला अभिमान वाटतो की माझे विद्यार्थी गेले पंधरा वर्ष यावर काम करत आहे मला वन मोबाईल टीव्हीसी सोडले गेलेल्याचा अभिमान आहे. आणि आनंदही आहे कारण माझ्या विद्यार्थ्यांनी तसेच इतर जे होतकरू आहेत त्यांनी केलेल्या कामाची ह्या मोबाईल अॅप वर पावती मिळेल.

 

स्वप्नील जोशी म्हणाले, “या सहकार्याबद्दल आम्ही ‘व्हिसलिंग वूड्स’ आणि सुभाष घईजी यांचे खूप खूप आभारी आहोत. ही तर दीर्घकालीन सहकार्याची सुरुवात आहे. आज बॉलीवूडमध्ये ज्यांनी नाव कमावले आहे अशा काही दिग्दर्शकांचे त्यांच्या विद्यार्थीदशेतील चित्रपट पाहण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. हे सर्व चित्रपट हे सर्वप्रकारच्या कलाकृती आहेत आणि ते ‘व्हिसलिंग वूडस’मध्ये शिकत असताना बनविलेले आहेत. प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची एक उत्तुंग अशी मेजवानीच असेल. हे चित्रपट ४ ते ५ भारतीय भाषांमध्ये असून त्यात इंग्रजीचाही समावेश आहे.”

 

स्वप्नील जोशी यांनी या संयुक्त प्रकल्पासाठी ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’चे आणि संयुक्त पत्रकार परिषदेला हजेरी लावल्याबद्दल सुभाष घई यांचेही आभार मानले आहेत. “आमच्यासारख्या नवोदित कंपनीवर घईसरांनी जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे. त्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून आला असून त्यातून भविष्यात अधिक मोठे आणि अधिक चांगले उपक्रम हाती घेण्यासाठी प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. जेव्हा तुम्ही घईसाहेबांचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात जे शब्द पहिल्यांदा येतात त्यांत हुनर,भव्यता, कथाकथन, जागतिक दर्जाचे कथानक यांचा समावेश असतो आणि तेच त्यांचे वैशिष्ट्य आहे,” ते म्हणाले.

 

नरेद्र फिरोदिया म्हणाले, “ओटीटी कार्यक्रमासाठी भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे आणि ही बाब गेल्या दोन वर्षांमध्ये सिद्ध झाली आहे. या व्यासपीठावर भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना योग्य असे प्रतिनिधित्त्व मिळत नव्हते आणि त्यामुळेच आम्ही ‘1ओटीटी’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना त्याचा फायदा होणार आहे. आम्हाला आमच्या प्रेक्षकांना भारतीय भाषांमधील दर्जेदार कार्यक्रम द्यायचे आहेत. त्यामुळे हा ओटीटी भारताचा खराखुरा ओटीटी होणार आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’बरोबरच्या या संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही होतकरू आणि सर्वोत्तम प्रतिभा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत.”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 1 OTT (@1ottofficial)

चेतन मणियार म्हणाले, “‘1ओटीटी’या संमिश्र भारतीय भाषांमधील कार्यक्रम देणाऱ्या ओटीटीला ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’बरोबर सहकार्य करार करताना अतिशय आनंद होत आहे. ‘डब्ल्यूडब्ल्यूआय’ ही मुंबईस्थित आणि सुभाष घई यांच्या अध्यक्षतेखालील एक आघाडीची चित्रपट, संपर्क व सर्जनशील कला प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था ‘1ओटीटी’ला त्यांच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेले अलीकडील आणि उच्च करमणूकमुल्ये असलेले कार्यक्रम देणार आहे.”

 

“माझे असे मानणे आहे की या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. या भागीदारीतून एक परिसंस्था निर्माण होते आणि त्यातून उभरत्या प्रतिभेला त्यांची कला दाखविण्याची संधी मिळते. त्यातून प्रेक्षकांनाही उत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम मिळतात. ‘1ओटीटी’चा भर हा या अशा नवीन उपक्रमांवर असणार आहे. त्यातून दोन्ही संस्थांचा फायदा होणार आहे. त्यामुळे कित्येक अंगांनी पाहिल्यास या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत,” असेही चेतन मणियार यांनी म्हटले.  

 

 ‘1ओटीटी’हे ओटीटी(ओव्हर द टॉप) व्यासपीठ असून त्यावर भारतातील सर्व प्रमुख भाषांमधील कार्यक्रम सादर होणार आहेत.त्याद्वारे तो ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’ म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला येत आहे. हा खऱ्या अर्थाने ‘भारताचा ओटीटी’ बनणार असून त्यावर हिंदीबरोबर मराठी, बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट व मालिका सादर होणार आहेत.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive