'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.
सोशल मिडीयावर अरुंधती नेहमीच सक्रीय असते. मालिकेविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी , सीन्सविषयी त्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल ती सतत व्यक्त होत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट-व्हिडीओंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. पडद्यामागच्यासुध्दा अनेक गोष्टी मधुराणी इथे शेयर करते. मधुराणीने नुकताच एक व्हिडीओ शेयर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तुझ्या कानातही कुडी, त्यातही पैठणी साडी...या प्रसिध्द गाण्यावर अरुंधती फेम मधुराणीने आपल्या नजाकत आणि अदाकारीने घयाळ करणारा व्हिडीओ शेयर केला आहे.
चाहत्यांनाही लाडक्या ्रुंधतीचा हा ऑफस्क्रीन व्हिडीओ प्रचंड आवडला असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव सुरु केलाय.