By  
on  

मराठीमधील पहिली झोंबी फिल्म, 'झोंबिवली'चा वर्ल्ड डिजीटल प्रीमियर

झोंबिवली हा मराठीतला पहिलाच झोंबी सिनेमा असून त्यात ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अमेय वाघ आणि तृप्ती खामकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यूडली फिल्म्सची निर्मिती आणि फास्टर फेणे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन लाभलेला झोंबिवली हा सिनेमा विनोद आणि सामाजिक भाष्य यांची सरमिसळ आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर समीक्षक आणि चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले होते. 20 मे ला हा सिनेमा झी5वर डिजीटल प्रीमियरकरिता सज्ज आहे.   

ही कथा सुधीर (अमेय वाघ) या एका मध्यमवर्गीय इंजिनिअरची असून तो त्याची गर्भवती पत्नी, सीमा (वैदेही परशुरामी) सोबत डोंबिवलीतील टोलेजंग इमारतीत राहायला येतो. आपले उर्वरित आयुष्य छान जाईल ही त्याची अपेक्षा असते. तरीच सुरुवातीच्या काळात त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यानंतर लगेचच जवळच्या जनता नगर वस्तीत झोंबी उद्रेक अनुभवायला मिळतो. हे झोंबी कैक पटीत असतात, टोलेजंग इमारतीमधील लोकांचा भपका पार गळून पडतो. तिथे त्यांच्यासमोर उभे असलेले झोंबी फक्त रक्तपिपासू नसतात, ते अत्यंत हीन खलनायकी प्रवृत्तीचे टोकाचे स्वार्थी आणि अमानुष असतात.   

सर्वनाशी झोंबी सिनेमाला विनोदाचा तडका असला तरीही ही कलाकृती श्रीमंत-गरीब दरी, बाईचे मायाळू मन, अविचारी शहरी विकास आणि झोपडीत राहणाऱ्यांविषयी समाजात असलेल्या पूर्वग्रहांवर भाष्य करते.   

झी5 इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा म्हणाले, “झी5 मध्ये आमचे लक्ष्य नेहमीच भाषांमधील समृद्ध मजकुरावर असते. ज्यामुळे देशांमधील आमच्या प्रेक्षकांशी नाळ जोडलेली राहते. आमच्या ग्राहक-प्राधान्य तत्त्वज्ञानाचे पालन करत, आम्हाला झोंबिवलीच्या डिजीटल प्रीमियरची घोषणा करताना आनंद होतो आहे. या कलाकृतीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हा कथेची संकल्पना अभिनव असून त्यात प्रतिभावंत कलाकार मंडळी आहेत. समाजातील बेबंद वृत्तीसोबत हलका-फुलका तडका कथेला खमंग बनवते. झी5च्या सर्वच भाषा व कथा प्रकाराशी निगडीत साहित्य अस्सल, साजेसे आणि विश्वासार्ह ठेवण्याच्या आमच्या उद्देशाला समर्पित आहे. झी5तर्फे प्रादेशिक साहित्य अधिक आशयघन करण्याचा प्रयत्न सुरू असून झोंबिवलीच्या निमित्ताने मराठी
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाला, “आम्ही कोविड उद्रेकानंतर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी बराच काळ वाट पाहिली, तरीच सिनेमाला मिळालेले यश ही आमच्या मेहनतीला मिळालेली पोचपावती आहे. आम्ही एकत्र येऊन या संकल्पनेवर विश्वास ठेवला. झोंबिवली ही मराठीमधील पहिली झोंबी फिल्म आहे. आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना प्रेक्षकांकडून दाद मिळाल्याने आनंद वाटतो. या जागतिक संकल्पनेला स्थानिक विषयांची फोडणी दिली आहे. ज्यांना अजूनही हा सिनेमा पाहता आला नाही, त्यांनी तो झी5वर पाहावा”.    
अभिनेता अमेय वाघ म्हणाला, “सामाजिक संदेशासोबत विनोदाची चटक दिल्याबद्दल मला आमच्या दिग्दर्शकाचा फार अभिमान वाटतो. ही एक परिपूर्ण कलाकृती आहे. झोंबिवली हा एक मजेदार सिनेमा आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र या सिनेमाची मजा घेता येईल आणि हास्याची कारंजी उडतील. शिवाय हा सिनेमा प्रेक्षकांना विचार करायला लावेल. या सिनेमाचं शूटींग करताना आम्ही खूप मजा केली. झी 5 वरील डिजीटल प्रदर्शनाकरिता मी उत्सुक आहे. त्यामुळे आम्हाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची व्यापक संधी मिळणार आहे”. 
अभिनेत्री वैदेही परशुरामी म्हणाली, “मी जेव्हा ही कथा वाचली, त्या मिनिटापासून या संकल्पनेच्या प्रेमात पडले. कोविडमुळे या सिनेमाच्या निर्मितीत अनेक अडथळे आले. मात्र प्रतीक्षेची लज्जतच निराळी होती. आता झोंबिवली भारताचा सर्वात मोठा स्वदेशी ओटीटी मंच, झी5वरून 190+ देशांत प्रदर्शित होतो आहे, हा सिनेमा सर्वांचे मन जिंकून घेईल, याची मला खात्री वाटते”.   
~20 मे रोजी झी5वर झोंबिवलीचा प्रीमियर ~

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive