By  
on  

मुलगी झाली हो ! 'सुख म्हणजे नक्की हेच असतं'! देवकी फेम मीनाक्षी राठोडला कन्यारत्नाचा लाभ

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री मिनाक्षी राठोड सोशल मिडीयावर बरीच सक्रीय ्सते. मिनाक्षीने या मालिकेत देवकी ही व्यक्तिरेखा साकारलीय. मिनाक्षीने काही दिवसांपूर्वीच आपण आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. नुकतंच तिच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. मिनाक्षी आणि तिचे पती कैलास वाघमारे यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. मुलगी झाली हो..म्हणत दोघांच्याही आनंदाला पारवार उरला नाहीय. 

मिनाक्षीच्या डोहाळे जेवणापासूनच चाहत्यांना ती आई झाल्याची बातमी कधी देतेय याची उत्सुकता लागली होती. खऱ्या आयुष्यात मीनाक्षीच्या आई या नव्या भूमिकेला चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सुख म्हणजे नक्की हेच असतं असं म्हणत ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे

 

त्यानंतर मीनाक्षी आणि कैलास यांनी नवी कार खरेदी केल्याचे फोटोही पोस्ट केले होते. दोनाचे चार झालो अशी हटके कॅप्शन खूप व्हायरल झाली होती. दरम्यान मीनाक्षी अगदी नवव्या महिन्यापर्यंत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करत होती. त्यासाठी तिला मालिकेच्या टीमने सहकार्य केल्याचंही तिने सांगितलं होतं. तसंच गेल्या महिन्यापासून तिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि मातृत्वासाठी सज्ज झाली.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive