‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत उर्मिला कोठारेचे स्पष्टिकरण

By  
on  

स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रदर्शित होऊन महिना झाला. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. चिमुकल्या स्वरा फेम अवनीने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. रसिकांची मालिकेला भरभरुन पसंती मिळत असतानाच एक नवा ट्विस्ट समोर आला . तो म्हणजे स्वराच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्मिला कोठारे ही ह्या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या.

तसंच  नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात उर्मिला कोठारेला गंभीर आजार झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी तिची मुलगी स्वरा ही पैशाची धडपड करताना पाहायला मिळते. मात्र या आजारपणात तिचा मृत्यू होणार आहे. त्यानंतर ती या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे बोललं गेलं. परंतु नुकतंच खुद्द उर्मिलानेच या सर्वांवर आपली प्रतिक्रीया देणारी पोस्ट सोशल मिीयावर केली आहे. 

 

 

उर्मिला व्हिडीओ शेयर करत म्हणते, 

“नमस्कार मी उर्मिला कोठारे,

स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मी वैदहीची भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेत माझा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे खूप उलट सुलट चर्चा सुरु आहेत. खूप अफवा पसरल्या आहेत. मी मालिका सोडली का? नक्की काय झालं? अशा अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत.

तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की खऱ्या मालिकेत एका महिन्यानंतर वैदहीचा मृत्यू हा लेखकाने लिहिलेला होता. त्याप्रमाणे गोष्ट चालली आहे. मी अजिबात मालिका सोडलेली नाही. त्यामुळे ज्यांना याबाबतचे प्रश्न पडले, अनेक अफवा पसरल्या आहेत, त्यांना मी विनंती करते की अशा अफवा पसरवू नका. मी अजूनही त्या मालिकेत काम करत आहे आणि स्वराच्या आठवणीत मी तुम्हाला दिसत राहणार आहे”, असे उर्मिलाने या व्हिडीओत म्हटले आहे.

 

Recommended

Loading...
Share