By  
on  

“ऐकून छान वाटतंय तुम्हाला…”, तेजस्विनी पंडितची ‘रानबाजार’ सीरिजबद्दलची पोस्ट वाचा

लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत तिच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या रानबाजार या वेबसिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मिडीयावर सतत क्रीय असणा-या तेजस्विनीने नुकतीच ‘रानबाजार’ या तिच्या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि प्रतिसादाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

तेजस्विनीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनीने ‘रानबाजार’ सीरिजमधील तिची भूमिका आयेशाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “ऐकून छान वाटतंय ! तुम्हाला Ayesha ची कहाणी आवडतेय….बघितली का? रानबाजार’, ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर !” असे कॅप्शन तेजस्विनीने दिले आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive