By  
on  

Video : जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणा-या ‘फनरल’चा ट्रेलर पाहिलात का?

असं म्हणतात... आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस ! जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वाटूनही घेतला पाहिजे. अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमधे, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत 'फनरल' हा मराठी सिनेमा १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे. या चित्रपटाने पीफ, इफ्फी, राजस्थान,कोकण यांसारख्या देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपट रूपात मांडली आहे. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन आलेल्या ‘फनरल’ चित्रपटात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे यांच्या भूमिका आहेत.

आयुष्य म्हणजे फक्त जन्माला येणं, पैसे कमावून ठेवणं, स्वतःसाठी ऐषोरामी जगणं आणि एक दिवस जगाचा निरोप घेणं एवढीच संकल्पना आहे. याच संकल्पनेला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अंतिम क्षणाचा हा सोहळा आनंदाने आणि तृप्त मनाने अनुभवत आपल्या आयुष्याचा समरसून आनंद घेता येऊ शकतो. हे नायकाच्या (हीरा) आणि त्याच्या मित्रांच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने दाखविण्यात आले आहे. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीच असतो फक्त तो शोधता आला पाहिजे. हे दाखवणारा हा चित्रपट नात्यांचे भावनिक बंधही तितक्याच प्रकर्षाने दाखवून देतो.

चित्रपटातील ‘विषय कट’ हे प्रेमगीत तसेच ‘पंखा फास्ट करू दे’ पार्टी सॉंग सध्या चांगलच गाजत असून ही दोन्ही गाणी प्रेक्षक पसंतीस उतरली आहेत. विषयापासून ते प्रमोशनपर्यंत सगळयाच बाबतीत आपल वेगळेपण जपणाऱ्या  या चित्रपटाने प्रमोशनसाठी तयार केलेला भला मोठा मार्टिन कावळा चर्चेचा विषय ठरला.

‘फनरल’ चित्रपटाचे संकलन निलेश गावंड तर छायांकन अनुराग सोळंकी यांनी केले आहे. कलादिग्दर्शन मनोहर जाधव आणि महेश साळगांवकर यांचे आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर तर साऊंडची जबाबदारी सूर्या मुकादम आणि गंधार मोकाशी यांनी सांभाळली आहे. क्रीएटीव्ह दिग्दर्शक रमेश दिघे आणि श्रीपाद जोशी आहेत. असोशिएट निर्माते प्रदीप दिघे आहेत. कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ तर सहाय्यक निर्माते विश्वास भोर व सचिन ढमाले आहेत. सहाय्यक दिग्दर्शक दीप व्यास तर चीफ सहाय्यक दिग्दर्शक डॉ. गिरीश मोगली आहेत.

सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा विषय ‘फनरल’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सद्यस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंत:र्मुख करेल असे निर्माते व लेखक रमेश दिघे सांगतात. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटले पाहिजे, हाच विचार करुन सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा विषय ‘फनरल’ चित्रपटात मांडल्याचे दिग्दर्शक व निर्माते सांगतात.

‘फनरल’ १० जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive