By  
on  

काजोल आईला घाबरते?, 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सांगितलं कारण

आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तनुजा आणि काजोल ही मायलेकींची जोडी आज 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच  विशेष अतिथी भागात सहभागी होणार आहेत. लहानपणी काजोल खूप मस्तीखोर होती. आईचं काहीच ऐकायची नाही. त्यामुळे तिने आईच्या हातचा खूप मार खाल्ला आहे. आणि म्हणूनच काजोलची रवानगी हॉस्टेलवर करण्यात आली.

पाचगणीच्या शाळेतील शिक्षण , काजोलची वाचनाची तर तनुजाची विविध भाषा शिकण्याची आवड , निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर काम करण्याचा तनुजा यांचा अनुभव , काजोलच्या डोळ्यांचा किस्सा , काजोलच्या नावाची गंमत अशा अनेक  गोष्टींचा उलगडा 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या विशेष भागात होणार आहे. पाहायला विसरु नका 'कोण होणार करोडपती' - विशेष भाग , 11 जून रात्री 9 वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive