By  
on  

क्रांती रेडकर म्हणतेय... व्हिडिओ लाईक करा की..."

अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोस् बरोबर काही रिल्स व्हिडीओ देखील शेयर करत असते आणि तिच्या या रिल्सना चाहत्यांकडून देखील तुफान प्रतिसाद मिळतो. नुकतंच क्रांतीने असचं एक मजेशीर रील् शेअर केलं असून तिचा हा रील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

क्रांतीने शेयर केलेल्या व्हिडिओत सुरुवातीला ती थोडी गंभीर दिसत आहे, मात्र ती जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा तो व्हिडीओ विनोदी वाटतो. यात क्रांती म्हणतेय की, "कधी ऐकलंय का?, व्हिडिओ लाईक केल्याने एखादा माणूस मेलाय म्हणून... नाही ना... मग व्हिडिओ लाईक करा की..." असा एक हिंदी डायलॉग ती या व्हिडिओत बोलत आहे. तिचं हे रील्स सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.

तिच्या या रीलला नेटकऱ्यांनी देखील तुफान प्रतिसाद देत व्हिडीओखाली लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत "why take the risk" असं म्हटलं आहे तर एकाने "तु सुद्धा व्हिडिओ लाईक करत जा" अशी कमेंट केली आहे. एकूणचं काय तर क्रांतीचा हा विनोदी अंदाज तिच्या चाहत्यांना खूपचं आवडला आहे.

क्रांती रेडकरने 'सून असावी अशी' या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. त्यानंतर अजय देवगण सोबत 'गंगाजल' या हिंदी चित्रपटात देखील दिसली होती. मराठीत 'जत्रा' चित्रपटातील "कोंबडी पळाली" या गाण्यामुळे तिला तुफान लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने 'काकण' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. तसंच 'किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी' या मराठी चित्रपटातील 'लूटला' हे गाणेही तिने गायले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive