'मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये' ; विराजसची ती पोस्ट चर्चेत!

By  
on  

'माझा होशील ना' मालिकेतून घरघरांत पोचलेला कलाकार म्हणजे अभिनेता विराजस कुलकर्णी. विराजस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नेहमीच तो त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यानं 'मी गेली तीन दिवस झोपलोच नाहीये', असं म्हटलंय.

त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स करत विविध तर्क वितर्क लावले आहेत. त्याच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने 'लग्न झालं आता तुझं, आता असचं होणार' अशी कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे.

आता विराजस तीन दिवस का झोपू शकला नाहीये हे त्यानं त्याच्या पोस्टच्या पुढच्या वाक्यात म्हटलंय. विराजसनं लिहिलंय, "मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण अधून मधून उठावं लागतं". विराजसच्या या पोस्टमुळे त्याचा मिश्किल अंदाज पाहायला मिळत असून त्याच्या या पोस्टमुळे सर्वानाच हसू येतंय. 

त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. शिवानी आणि विराजस यांचं काही दिवसांपूर्वीचं लग्न झालं. लग्नाला एक महिना पूर्ण होताच विराजस आणि शिवानी यांनी लग्नाचा एक धम्माल व्हिडीओ शेअर केला होता. त्याचीही खूप चर्चा पाहायला मिळाली.

Recommended

Loading...
Share