विशाळगडाच्या पायथ्याशी घरकुल बांधण्याची स्वप्नपूर्ती करणा-या अभिनेत्याचा गृहप्रवेश

By  
on  

बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेता अजय पुरकर यांनी साकारली होती. अजय पुरकरांनी ही भूमिका नुसती साकारलीचं नाहीतर त्यांनी ती भूमिका जगली. असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना अमाप लोकप्रियतेसोबतचं खूप प्रेम देखील मिळाले.

याच अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी एक घर बांधले आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्या पावनखिंडीत आपलं एक घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि ही इच्छा त्यांनी पूर्ण केलीच. नुकतंच त्यांनी त्यांच्या या स्वप्नूर्ती केलेल्या घराचा गृहप्रवेश केला अहे. 

 अजय यांनी नव्या घरात प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या नवीन घराच्या दारात उभं राहून फोटो काढला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, “१९ जूनला नवीन घरामध्ये गृहप्रवेश. त्याच दिवशी ‘पावनखिंड’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर. योग जुळून आलाय. उत्तम मुहूर्तावर दोन्ही गोष्टी घडल्या. महादेवाचा आर्शिवाद.”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

 

सोशल मिडीयावर अजय यांच्या या गृहप्रवेशाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Recommended

Loading...
Share