By  
on  

निर्माता, अभिनेता मंगेश देसाई यांची नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठीची 'ती'पोस्ट चर्चेत

 शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला. यानंतर सर्वच स्तरातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. आता धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी शुभेच्छा दिल्यानंतर आणखी एक पोस्ट केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आपली पहिली भेट मला आठवते साहेब .वागळे इस्टेट मध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो २००७ साली .तुम्ही आमदार होतात त्या वेळी .तुम्हाला पहिल्यांदा भेटलॊ होतो .तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो .पण तुम्ही खूप छान बोललात .सचिन जोशी ला मला तुमचं व्हिसीटींग कार्ड द्यायला लावलत ,आणि "काहीही मदत लागली तर सांगा "असं आवर्जून म्हणालात .माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच .तीही तुम्ही एका मिनटात केलीतही .आणि त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एका भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो ,तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात "हे कशाला ?आपण मित्र आहोत मंगेश ".
आणि खरंच मित्र झालात .अजून एक प्रसंग आठवतो .

सगळे तुम्हाला नमस्कार करायचे ,मी पण केला एकदा .तेव्हा "हे करत जाऊ नका .आपण मित्र आहोत ."असच म्हणालात .आणि खरंच मित्र झालात .आणि नंतर जसजसे वर्ष सरत गेले तसे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलात ,प्रत्येक प्रसंगात .त्या बद्दल हृदयपूर्वक आभार साहेब .
माझी २०१३ पासून मनात असलेली" दिघे "साहेबांवरच्या चरितपटाची मनोकामना पूर्ण करून माझी निर्माता म्हणून ओळख घडवलीत .
रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत .
आज तुम्ही महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री झालात .
प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा ,माणसाशी माणुसकिने वागणारा ,विरोधकांना नामवणारा आणि क्षमा करणारा, अहोरात्र काम करणारा मी जवळून बघितलेला एक समाजकारणी मुख्यामंत्री झाला याचा खूप अभिमान वाटतो .

आपल्याला उदंड आयुष्य लाभो ,महाराष्ट्र घडवण्यात तुमचा मोलाचा वाट राहो हीच दत्त गुरूंकडे प्रार्थना .
जय हिंद 
जय महारा

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive