बॉलिवूड गाजवणारी प्रतिभावान अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. सध्या ती सिनेमांशिवाय अनेत धम्माल रील्स शेयर करण्यामुळे चर्चेत असते. नुकतंच तिने शेयर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिचं मराठी प्रेम जगजाहीर झालं आहे. तिने शेयर केलेल्या रील व्हिडीओत ती खोकल्यावर रामबाण उपाय सांगताना दिसतेय, आणि तोसुध्दा चक्क मराठीत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल यात तिळमात्र शंका नाही.
चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी विद्याच्या या व्हिडीओवर कमेंट् करत व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं आहे.
विद्या बालनच्या इन्सटापेजवर नजर टाकली, तर तिने अनेक मजेशीर रील्स शेयर केल्याचं पाहायला मिळतंय. चाहतेही तिच्या या रील्सना उत्तम प्रतिसाद देतात.