By  
on  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज, म्हणतात

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना मनापासून हसवतो. धमम्ला विनोदी स्किट्समुळे या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढते. गेली तीन चार वर्ष सुरु असलेल्या या कार्यक्रमातील विनोदवीरांच्या अफलातून अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांनी प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवलंय. महाराष्ट्राटी हास्यजत्रा या कार्यक्रमाला कॉंटे की टक्कर देण्यासाठी झी मराठी वाहिनीने फु बाई फु हा जुना विनोदी कार्यक्रम पुन्हा नव्या विनोदवीरांसह आणि परिक्षकांसह सुरु केला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार भोजने हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या विनोदाची एक खास शैली आहे. त्यामुळेच त्याच्या विनोदी अभिनयाने त्याने एक खास स्थान निर्माण केलंय. त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. सध्या तो झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात झळकत आहे. त्या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.पण त्याच्या चाहत्यांना त्याचा हा फु बाई फु मध्ये जाण्याचा निर्णय अजिबात आवडलेला दिसत नाहीय. 

झी मराठीने नुकतंच त्यांच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओंकार भोजने, आशिष पवार, सागर कारंडे आणि पंढरीनाथ कांबळे हे विनोदवीर स्किट सादर करतायत. पण यात ओंकार भोजनेला पाहून चाहते नाराज होऊन प्रतिक्रीया देत आहेत. 

 “ओंकार भोजने, फर्स्ट टाइम फक्त्त तुझ्यासाठी हा प्रोग्राम बघायला आले…अजिबात आवडलं नाही, तू इथे येऊन फार मोठी चूक केली आहेस…असं माझं वैयक्तिक मत आहे.. फक्त्त इथे येऊन तू तुझं करिअर बरबाद करू नकोस… बाकी पुढे तुझं नशीब. स्वामी तुला लवकरच सुबुद्धी देवोत, ॐ श्री स्वामी समर्थ” असे एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर एकजण लिहतो, 

“२० टक्के वाढीसाठी ८० टक्के करिअर खराब होतंय”, असे म्हटले आहे. “झी मराठी वाहिनीचे विशेष आभार… महाराष्ट्राची हास्यजत्राचा आदार कित्येक पटीने वाढला. ओंकार भावा चूकलास”, असे एक व्यक्ती म्हणाला. तर एकाने “ओमकार भोजने मला फार वाईट वाटतेय तुझा निर्णय अजुनही बदल. हास्यजत्रामध्ये आम्हीं तुला मिस करतोय अग अग आई….., आणि अजुन खूप काही प्लीझ वेळ गेली नाही. हास्यजत्रेमध्ये परत ये”, अशी विनंती एक नेटकरी करतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive