महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना मनापासून हसवतो. धमम्ला विनोदी स्किट्समुळे या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढते. गेली तीन चार वर्ष सुरु असलेल्या या कार्यक्रमातील विनोदवीरांच्या अफलातून अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांनी प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवलंय. महाराष्ट्राटी हास्यजत्रा या कार्यक्रमाला कॉंटे की टक्कर देण्यासाठी झी मराठी वाहिनीने फु बाई फु हा जुना विनोदी कार्यक्रम पुन्हा नव्या विनोदवीरांसह आणि परिक्षकांसह सुरु केला आहे.
प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी खळखलून हसवणा-या विनोदवीरांनी म्हणजेच विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, पॅडी कांबळे यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
सचिन गोस्वामीची पोस्ट
“मोराने पिसारा फुलवत थुई थुई नाचावे.. बगळ्याने उंच भरारी घ्यावी. मोराने बगळ्याचे अनुकरण करू नये, बगळ्याने मोराचे अनुकरण करू नये. आपली क्षमता, विशेषता ओळखावी, नैसर्गिकता जपावी. सौंदर्य त्यातच आहे. कलाकृतीचेही असेच असते”, अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी शेअर केली आहे.
सचिन गोस्वामी यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ‘टोमणा की सुविचार? असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला आहे. त्यावर सचिन गोस्वामी यांनी आत्मचिंतन…असे म्हटले आहे.