ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या दिवसांपासून एडमिट आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं गेल्या दोन दिवसांपासून सांगण्यात येत ङोतं. पण नुकतीच त्यांची एक हेल्थ अपडेट समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे.
“विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत असून हात, पाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकेल असं वाटत आहे. त्यांचा रक्तदाब आणि हदयाची क्रिया स्थिर आहे,” अशी माहिती शिरीष याडगीकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.