मराठी कलाविश्वासाठी आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाला अवघे 15 दिवस उलटून गेले असताना आता ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण आज 10 डिसेंबर रोजी काळाच्या पडद्याआड गेल्या.
कस काय पाटील बर हाय का?, पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना, तुझ्या उसाला लागला कोल्हा, अशा अनेक लोकप्रिय गाण्यांना त्यांचा बुलंद आवाज दिला होता. ही गाणी खूप लोकप्रिय ठरली. आजही या गाण्यावर रसिक श्रोते बेभान होतात, हीच त्यांच्या कामाची मोठी पोचपावती आहे.