By  
on  

‘पावनखिंड’ फेम अभिनेता हरिश दुधाडे अडकला लग्नबंधनात

अनेक सेलिब्रिटी यंदा लग्नबंधनात अडकतायत. लॉकडाऊनच्या दोन वर्षांनंतर जग पूर्वपदावर आलं आहे आणि सगळेचं जण आपले अविस्मरणीय सोहळे साजरे करतायत. हार्दिक जोशी- अक्षया देवधर, आशय कुलकर्णी- सानिया गोडबोले या जोड्यांनंतर सिनेसृष्टीतला आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढलाय. पावनखिंड’, ‘शिवप्रताप गरुडडझेप’, ‘फत्तेशीकस्त’, ‘फर्जंद’ अशा ऐतिहासिक सिनेमांत  महत्त्वपूर्ण भूमिकेंतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा आणि छोटा पडदासुध्दा आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारा अभिनेता हरिश दुधाडे लग्नबंधनात अडकला आहे. समृध्दी असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा शानदार  लग्नसोहळा पार पडला. 

अभिनेता अंकित मोहनने हरिश दुधाडेच्या रिसेप्शन सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. तसंच ह्या सोहळ्यातले फोटोसुध्दा शेयर केले होते. 

 

नुकतंच हरीशने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे त्याने तो विवाहबंधनात अडकला असल्याची माहिती दिली आहे. या फोटोला त्याने फारच हटके कॅप्शन दिले आहे. “आणि नवीन प्रवासाला सुरुवात…” असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने #wedding #weddingday #happilymarried असे हॅशटॅगही शेअर केले आहेत. हरीश दुधाडेच्या पत्नीचे नाव समृद्धी निकम असे आहे.

सध्या हरिश रत्नाकर मतकरी लिखीत ‘काळी राणी’ नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यापूर्वी तो तुमची मुलगी काय करते या सोनी वाहिनीवरच्या नाट्यमय थरारक मालिकेत मुख्य भूमिकेत होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive