मराठी मालिका आणि नाटकांमधून आपली ओळख निर्माण करणारे पराग बेडेकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आभाळमाया या लोकप्रिय मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. पराग बेडेकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध लेखक चंद्रशेखर गोखले यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
पराग यांनी यदा कदाचित', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', 'लाली लीला', 'पोपटपंची', 'सारे प्रवासी घडीचे' या दमदार नाटकांमध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या अशा अचानक एक्झिटने सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे.