By  
on  

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेंचा नवीन सिनेमा, पाहा Poster

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले . समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून समीर चौघुले हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी अभिनयाच्या वर्षावात न्हाऊन टाकतात. त्यांच्या स्किट्सची चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. 

आजवर अनेक मालिक व सिनेमातून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. आता ते एक नव्या चित्रपटातून आणि नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर चौगुलेंनी चित्रपटातील त्यांच्या लूकचा फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

‘बांबू’ असं समीर चौगुलेंच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “नवी फिल्म, नवा आमचा पण अवतार…!!”, असं कॅप्शन त्यांनी शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive