By  
on  

केतकी चितळेची पुन्हा वादग्रस्त पोस्ट, “कालीमातेला दारुचा नैवेद्य असतो तर शंकराच्या मंदिरात…”

अभिनेत्री केतकी चितळे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. वेगवेगळी बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेण्यात तिचा हात खंडा आहे. केतकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी तिला चांगलीच खरी खोटी सुनावली आहे. आता केतकीने या सर्व प्रकरणावर सडेतोड उत्तर दिले आहे.

केतकीने सरत्या वर्षाला निरोप देताना 31 डिसेंबरच्या रात्री एक पोस्ट शेयर केलीय.  यात तिच्या हातात दारुचा एक ग्लासही पाहायला मिळत होता. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”. तिच्या हातातील दारुचा ग्लास पाहून नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

 

 

केतकीचा हा व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला, “वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायचं..”! त्याची ही कमेंट पाहून केतकी चितळे चांगलीच संतापली. यावर तिने सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे.

“मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका?
२. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही.
३. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका”, असे केतकी चितळेने म्हटले आहे. त्यावर त्या नेटकऱ्याने धन्यवाद असे म्हटले आहे.

 

केतकी आणि नेटक-यांमध्ये सध्या जबरदस्त जुंपली आहे. तिच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रीया येत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive