By  
on  

प्रेक्षकांना लागलं रितेश-जिनिलीयाचं 'वेड', बॉक्स ऑफीसवर केली इतकी कमाई

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसातच बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीमध्ये त्याचा सहभाग झाला आहे.

वेड हा चित्रपट शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. चित्रटाने शनिवारी ३.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर रविवारी चित्रपटाने ४. ५० कोटींचा गल्ला जमावला. प्रदर्शनाच्या तीन दिवसात चित्रपटाने १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

वेड या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. आजवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे. हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सैराट आहे. या चित्रपटाने १२.१० कोटी कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टाइमपास २ आहे. या चित्रपटाने ११ कोटींचा गल्ला जमावला होता. नटसम्राट हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने १०.२५ कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर रितेशचा लय भारी चित्रपट आहे. या चित्रपटाने १०.५५ कोटी कमावले होते. आता १० कोटी कमावत वेड चित्रपट या यादीमध्ये सहभागी झाला आहे.

वेड या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर, शुभंकर तवडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive