अभिनेत्री अक्षया गुरवने नवीन वर्ष दणक्यात सुरु केलं आहे. नवीन वर्षीच ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन , फॅन्सना चांगली भेट दिली. तिच्या या फोटोने सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळवली आहे. 2023 ची अशी चांगली सुरुवात झाल्यानंतर अक्षया गुरव आता नवीन चॅलेंजेस घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षयाला या बद्दल विचारले असता अक्षया सांगते,’’ 2022 हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं गेलं. मी काही उत्तम सिनेमा शूट केले. त्यात सुजय डहाकेचा श्यामची आई, समीत कक्कड यांचा रानटी , तसंच डंका या सिनेमांचा समावेश आहे. हे सर्व सिनेमा या वर्षी प्रदर्शित होतील याची उत्सुकता आहे.’’ त्यामुळे या वर्षी अक्षयाच्या विविध भूमिका प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. त्याच प्रमाणे 2022 च्या इफ्फीमध्ये फ्रेम हा सिनेमा दाखवण्यात आला होता. फ्रेमही यावर्षी प्रदर्शित होणार आहे.
अक्षयासाठी हे वर्ष महत्वाचं आहे, त्या बद्दल ती सांगते, ‘’गेल्या वर्षी राज्य पुरस्कारांमध्ये रिवणावायली या सिनेमासाठी मला नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारांची प्रतिक्षाही या वर्षी आहे.’’अक्षयाला या वर्षी सिनेमा -वेबसिरीज अशा माध्यमात उत्तमोत्तम काम करायचं आहे.
‘’कामा व्यतिरीक्त स्वतःच्या फिटनेसवर लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायच्या आहेत. मला वेगवेगळ्या जागा पाहायला आवडतं, नवीन माणसांना भेटायला आवडतं. त्यामुळे खूप फिरायचं आहे. यातल्या जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे. महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून अधिक उत्तम बनायचं आहे.’’, असं अक्षयाचं नवीन वर्षाचं प्लॅनिंग आहे. त्यामुळे अक्षया नवीन वर्षात कोणत्या भूमिकेत दिसून येते याची उत्सुकता आहे.