By  
on  

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी केली अटक

राखी सावंत म्हणजे एंटरटेन्मेन्ट एंटरटेन्मेन्ट आणि एंटरटेन्मेट. यंदा बिग बॉस मराठी सीझन 4 चं घर राखीने गाजवलं. चॅलेंजर्स म्हणून घरात आलेल्या राKrने आपल्या कारनाम्यांनी घर तर दणाणून टाकलंच पण त्याचबरोबर सदस्यांच्या नाकेनऊ आणले. आता बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलेली राखी आदिलशी निकाह केल्यामुळे बरीच चर्चेैत आहे. तसं तर लाईमलाईटमध्ये राहण्याचा राखीचा नेहमीच अट्टाहास असतो, त्यासाठी ती कुठलीही पातळी गाठायला नेहमीच तयार असते. पण नुकतंच राखीला अटक झाल्याची ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. 

अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. या महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता. यासंदर्भात संबंधित मॉडेलनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.

 

दरम्यान, राखी सावंतला थोड्या वेळात न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यानंतर तिला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल, याबाबत चित्र स्पष्ट होईल.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive